जलसुलभता आणि सामाजिक ऐक्यासाठी ही मानद डॉक्टरेट पदवी उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांना देण्यात आली – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

15

पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पायाभूत सुविधा, औद्योगिक विकास, जलसंधारण व सामाजिक समानतेसाठी त्यांनी केलेल्या कार्याबद्दल जपानच्या कोयासन विद्यापीठातर्फे मंगळवारी डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. कोयासन विद्यापीठाच्या 120 वर्षाच्या इतिहासात मानद डॉक्टरेट मिळणारे देवेंद्र फडणवीस हे पहिले भारतीय आहेत. मुंबई विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून देवेंद्रजींचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, आपल्या सगळ्यांना अभिमान वाटेल असा हा कार्यक्रम आहे. जलसुलभता आणि सामाजिक ऐक्यासाठी ही मानद डॉक्टरेट पदवी उपमुख्यमंत्री फडणवीस यांना देण्यात आली. महाराष्ट्र आणि जपान यांचे नाते दृढ करण्यासाठी हे महत्वाचे पाऊल आहे. आपले राज्य परकीय गुंतवणूक करण्यात आघाडीवर असून त्यात जपानने सर्वाधिक गुंतवणूक महाराष्ट्रात केली असल्याचे ते म्हणाले.

 

राज्यातील जनतेचे आशीर्वाद, वरिष्ठ नेत्यांचे सहकार्य आणि सहकाऱ्यांची साथ यांच्यामुळे जपानमधील कोयासन विद्यापीठाची मानद डॉक्टरेट पदवी मला मिळाली. ही पदवी मी महाराष्ट्रातील जनतेला समर्पित करतो. राज्यासाठी आणि देशासाठी जे चांगले करता येईल ते मी करेल, अशा भावना व्यक्त करीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2035 मध्ये 75 वर्षे पूर्ण करीत असलेल्या महाराष्ट्राच्या विकासाचे मानचित्र तयार करत असल्याचे सांगितले.

यावेळी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,कामगार मंत्री सुरेश खाडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, पणन मंत्री अब्दुल सत्तर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, कोयासन विद्यापीठाचे प्रो. इन्यूई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील कैन्सिल जनरल डॉ.फुकहोरी यासुकाता आणि कोयासन विद्यापीठाचे प्रमुख अधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.