५३ व्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे उदघाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न

26

सोलापूर : सोलापूर येथे श्री सिद्धेश्वर महा यात्रेनिमित्त कृषी विभाग व मंदिर समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या ५३ व्या श्री सिद्धेश्वर कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन गुरुवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. सोलापूर जिल्ह्यासह नजीकच्या परिसरातील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी या कृषी प्रदर्शनातील अद्यावत कृषी तंत्रज्ञानाची माहिती जाणून त्यांचा अवलंब शेतीसाठी करावा, या प्रदर्शनास मोठ्या प्रमाणात भेट द्यावी, असे आवाहन पाटील यांनी याप्रसंगी केले.

या कृषी प्रदर्शनातील विविध स्टॉल्सना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट देऊन पाहणी केली. स्टॉल वरील विविध तंत्रज्ञान व अद्यावत तंत्रज्ञाने उत्पादित शेती पिकांची माहिती त्यांनी जाणून घेतली. हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त असल्याने जिल्ह्यातील तसेच शेजारील जिल्ह्यातील नागरिक व शेतकरी यांनी प्रदर्शनाला भेट देऊन येथील अद्यावत तंत्रज्ञानाच्या माहितीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पाटील यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद देवस्थान समितीचे महादेव चाकोते, बाळासाहेब भोंगडे, बसवराज शास्त्री, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, कृषी उपसंचालक राजकुमार मोरे, जिल्हा कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे, प्रकल्प संचालक आत्मा मदन मुकणे यांच्यासह कृषी विभागाचे विविध अधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.