ताराराणी विद्यापीठात प्रगतीपथावर असलेल्या मुलींच्या वसतिगृहाच्या बांधकामाची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली पाहणी

18

कोल्हापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे सोमवारी कोल्हापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विविध कामांची पाहणी केली. कोल्हापूरमधील राजारामपुरी येथील ताराराणी विद्यापीठात प्रगतीपथावर असलेल्या मुलींच्या वसतिगृहाच्या बांधकामाची पाहणी देखील पाटील यांनी केली.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी संपूर्ण वसतिगृहाची पाहणी केली. सर्व कर्मचाऱ्यांशी त्यांनी संवाद देखील साधला. पाटील यांनी वसतिगृहाचे व्यवस्थापक आणि संबंधित अधिकारी यांच्याशी संवाद साधून वसतिगृहात देण्यात येणाऱ्या विविध सोयी सुविधांबाबत माहिती घेतली. तसेच, वास्तव्यास असणाऱ्या मुलींना सोयी सुविधांचा अभाव भासू नये, असे निर्देश देखील वसतिगृहाच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Get real time updates directly on you device, subscribe now.