ओबीसी समाजाच्या विकासासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यरत राहिले पाहिजे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

18
पुणे : भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहरच्या नवनियुक्त कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या उपस्थितीत नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. या नियुक्ती प्रदान कार्यक्रमास उपस्थित राहून भाजपा ओबीसी मोर्चाच्या सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांनी पक्षाचे संघटन वाढीसाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन चंद्रकांत पाटील यांनी केले. तसेच, ओबीसी समाजाच्या विकासासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कार्यरत राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. विद्यमान महायुतीचे सरकार मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी कसे प्रयत्नशील आहे यावर पाटील यांनी प्रकाश टाकला.
पाटील म्हणाले कि,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या काळात मराठा समाजाला आरक्षण मिळालं त्यात ओबीसी आरक्षणाला जराही हात आपण लावला नाही. त्यावेळी ओबीसी समाजाने त्यावेळच्या निर्णयाचे स्वागत केले. आम्ही वारंवार हि मागणी केली आहे कि, ज्या कारणाने मराठा समाजाचे आरक्षण सुप्रीम कोर्टात गेलं ती कारण शोधून आम्ही नव्याने सर्वेक्षण करत असल्याचे पाटील म्हणाले. मराठा समाज मागास कसा आहे हे आपण मांडू आणि मराठा समाजाला वेगळं आरक्षण देऊ असेही त्यांनी म्हटले.
यावेळी प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, उपाध्यक्ष राजेश पांडे, शहराध्यक्ष धीरज घाटे, ओबीसी मोर्चा शहर अध्यक्ष नामदेव माळवदे, यांच्या सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.