पुणे : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत ‘महाविजय 2024’ च्या संकल्पपूर्तीसाठी आयोजित करण्यात आलेल्या भाजपा सुपर वॉरियर्स मेळाव्यास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात प्रचंड बहुमताच्या विजयाच्या संकल्पपूर्तीचा निर्धार यावेळी करण्यात आला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी सर्व सुपर वॉरियर्सनी अहोरात्र मेहनत करावी, असे आवाहन याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी केले. आगामी काळात मकर संक्रांत आहे. त्यामुळे संपर्क से समर्थनवर कार्यकर्त्यांनी भर द्यावा असे आवाहन देखील याप्रसंगी त्यांनी केले.