इचलकरंजी शहरातील वस्त्रोद्योगाला नवी ऊर्जा मिळण्यासाठी हे प्रदर्शन निश्चितच उपयुक्त ठरेल – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

14
इचलकरंजी : वस्त्रनगरी इचलकरंजी येथे रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रल आणि डी.के.टी.ई. टेक्स्टाईल इन्स्टिट्यूटच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टेक्सपोजर या टेक्स्टाईल प्रदर्शनाला उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेट दिली.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, या प्रदर्शनामध्ये अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांची वस्त्रोद्योगासंदर्भातील उत्पादने प्रदर्शित करण्यात आली आहेत. यामध्ये ऑटोमेटेड हायस्पीड पॉवरलूम सह वस्त्रोद्योगाला लागणाऱ्या सर्व अत्याधुनिक मशिनरींचा सामावेश आहे. महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून परिचित इचलकरंजी शहरातील वस्त्रोद्योगाला नवी ऊर्जा मिळण्यासाठी हे प्रदर्शन निश्चितच उपयुक्त ठरेल. इचलकरंजीचा मेगा क्लस्टर मध्ये सामावेश झाल्यामुळे वस्त्रोद्योगाला भरीव अर्थसहाय्य उपलब्ध होणार आहे. या संधीचा लाभ घेऊन उद्योजकांनी नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करावा असे आवाहन याप्रसंगी केले.
यावेळी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, नितीनकुमार कस्तुरे, अंबरीश सारडा यांच्यासह रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलचे पदाधिकारी आणि यंत्रमाग व्यावसायिक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.