प्रभू श्रीरामचंद्राच्या आगमनाची आतुरता लागली असताना, गीतरामायणाचे श्रवण करण्याची संधी मिळणं म्हणजे जणू काही सुवर्णकांचन योगच – चंद्रकांत पाटील

27
पुणे : भाजपा नेते किरण दगडे पाटील यांनी कोथरुड मध्ये आयोजित केलेल्या गीतरामायण या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून गीतरामायणरुपी अमृताचा रसास्वाद घेतला.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर आणि स्वरतीर्थ सुधीर फडके ऊर्फ बाबूजी यांच्या अलौकिक प्रतिभेचा आविष्कार असलेले ‘गीतरामायण’ म्हणजे आपल्यासाठी एक अमृतच आहे. गीतरामायणाची गाणी ऐकताना अनेकदा मन भक्तिमय वातावरणात तल्लीन होऊन जातं. सध्या सर्वत्र २२ जानेवारी रोजीच्या प्रभू श्रीरामचंद्राच्या आगमनाची आतुरता लागली असताना, गीतरामायणाचे श्रवण करण्याची संधी मिळणं म्हणजे जणू काही सुवर्णकांचन योगच ! याचेच औचित्य साधून भाजपा नेते किरण दगडे पाटील यांनी हा योग जुळवून आणला असल्याचे पाटील म्हणाले.
कोथरुड मध्ये आयोजित केलेल्या या कार्यक्रमास पाटील यांनी उपस्थित राहून गीतरामायणरुपी अमृताचा रसास्वाद घेतला. यावेळी बाबुजींचे पुत्र श्रीधरजींनी गायलेल्या ‘पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा…’ ह्या गीताने साऱ्यांनाच भावनिक केलं. यावेळी श्रीधरजी, आनंद माडगुळकर आणि ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर यांना ऊर्जा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

Get real time updates directly on you device, subscribe now.