मुंबई : मा. विधानसभा अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी आमदार पात्रतेप्रकरणी बुधवारी निर्णय जाहीर केला. यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सरकार स्थापन करताना घटनात्मक आणि कायदेशीर प्रक्रियेचे पूर्ण पालन करण्यात आले असल्याचे नमूद करण्यात आले आहे. यानुषंगाने विद्यमान महायुतीचे सरकार संविधानिक, मजबूत आणि स्थिर आहे हे अधोरेखित झाले आहे, असे मत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, मागील काही काळात काही लोकांनी जाणीवपूर्वक आणि वारंवार विद्यमान सरकारबद्दल गैरसमज पसरवून राज्यातील वातावरण अस्थिर करण्याचा प्रयत्न केला. हा निर्णय त्या साऱ्यांसाठी चपराक आहे. मा. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी विविध पुरावे देऊन दिलेल्या आदेशानंतर सरकारच्या स्थैर्याबाबत कोणाच्याही मनात तसुभरही शंका असू नये, असेही ते म्हणाले.
पाटील पुढे म्हणाले कि, पुन्हा एकदा सांगताना मला अत्यंत आनंद होत आहे की, विद्यमान राज्य सरकार हे जनतेच्या मनातले सरकार आहे. कायद्याच्या चौकटीत बसणारे सरकार आहे. त्यामुळेच, हे सरकार आपला कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण करेल! त्यामुळे या निर्णयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन!
Get real time updates directly on you device, subscribe now.