दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी आम्ही पाठीशी सदैव राहणार असल्याची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

7
पुणे : आज स्वराज्यप्रेरीका राजमाता जिजाऊ माॅंसाहेब आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती! या शुभदिनाचे औचित्य साधून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुकुल माधव फाऊंडेशन आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन यांच्या माध्यमातून दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्था व वैद्यकीय संस्थेतील विद्यार्थ्यांना आज बेंच वाटप केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, महाराष्ट्राच्या इतिहासातील उत्तुंग व्यक्तिमत्व जिजाऊ माॅंसाहेब, तसेच भारताच्या संस्कृतीचा गौरव जगभर वाढविणारे स्वामी विवेकानंद या दोन्ही थोर व्यक्तिमत्वांनी आजीवन लढण्याची प्रेरणा दिली, समाजाला दिशा देण्याचे कार्य केले. यानुषंगाने दिव्यांग बांधवांच्या विकासासाठी आम्ही पाठीशी सदैव राहणार असल्याची ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.
या कार्यक्रमास आ. सुनील कांबळे, संस्थेचे कार्याध्यक्ष ॲड. मुरलीधर कचरे, ग्लोबल ग्रुपचे संचालक मनोज हिंगोरानी, माजी खासदार प्रदीपदादा रावत, मुकुल माधव फाऊंडेशनचे सचिन कुलकर्णी, क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.