भविष्यात अनाथांना उच्च शिक्षणासाठी फी द्यावी लागणार नाही, अशा प्रकारची तरतूद करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न –  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

15

पुणे : तर्पण फाउंडेशनचे संस्थापक व अध्यक्ष श्रीकांत भारतीय यांच्या ‘तर्पण युवा पुरस्कार’ या अनोख्या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास उपस्थित राहून समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करणाऱ्यांचा गौरव पाटील यांनी केला.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, राजमाता जिजाऊ माॅंसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांनी आपल्याला जीवनात संघर्ष करण्याची शिकवण दिली. या दोन्ही महान व्यक्तीमत्वांनी समाजाची काळजी करायला शिकवले. समाजातील १८ वर्षे पूर्ण झालेल्या अनाथांना सनाथ म्हणून ओळख देणे, हे अतिशय पुण्याचे आणि खडतर कार्य आहे. श्रीकांत भारतीय यांनी हे खडतर काम अतिशय कठोर परिश्रम घेऊन उभे केले आहे.‌
पाटील पुढे म्हणाले कि, विधान परिषदेचा आमदार म्हणून काम करतानाही ते याच विषयावर सर्वाधिक भर देत आहेत. त्यातूनच अनाथांना राज्यात एक टक्का आरक्षणाचा लाभ मिळाला. भविष्यात अनाथांना उच्च शिक्षणासाठी फी द्यावी लागणार नाही, अशा प्रकारची तरतूद करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे, अशी भावना या कार्यक्रमात पाटील यांनी व्यक्त केली

Get real time updates directly on you device, subscribe now.