शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व हुतात्मा स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण

17
सोलापूर,  : शहरातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व हुतात्मा स्मारकाच्या सुशोभीकरणाच्या कामाचे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.
 
याप्रसंगी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर तसेच हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी, हुतात्मा श्रीकिसन सारडा, हुतात्मा जगन्नाथ शिंदे, हुतात्मा अ. कुर्बान हुसेन यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून पाटील यांनी अभिवादन केले. दरम्यान, हुतात्मा मल्लप्पा धनशेट्टी यांच्या वंशज श्रीमती अन्नपूर्णा धनशेट्टी, हुतात्मा जगन्नाथ शिंदे यांचे नातू महादेव दीनानाथ शिंदे तसेच हुतात्मा अ.कुर्बान हुसेन यांचे वंशज हसीमोद्दीन शेख आदींचा पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
यावेळी नरेंद्र काळे, नगर अभियंता सारिका आकूलवार, उपअभियंता किशोर सातपुते, कनिष्ठ अभियंता परशुराम भुमकंटी, बिरू बंडगर, विजयकुमार गावडे आदी मान्यवर उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांची महापालिका इमारतीला भेट –
यानंतर स्मार्ट सिटी योजने अंतर्गत सोलापूर शहरातील वारसा स्थळापैकी सोलापूर महानगरपालिकेची इंद्रभुवन या इमारतीचे नुतनीकरण कामास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी इंद्रभवन इमारतीचे नूतनीकरण संदर्भातील संपूर्ण माहिती त्यांना दिली.
यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे, उपायुक्त मच्छिंद्र घोलप, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, नगर अभियंता सारिका आकूलवार, उप अभियंता युसुफ मुजावर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते

Get real time updates directly on you device, subscribe now.