मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या विक्रमी विजयासाठी संकल्पबद्ध व्हावे, चंद्रकांत पाटील यांचे महायुतीतील नेत्यांना आवाहन

7

सोलापूर : सोलापूर येथे भाजपा- शिवसेना – राष्ट्रवादी काँग्रेस या महायुतीच्या महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी गरीब जनतेसाठी राबवित असलेल्या लोककल्याणकारी योजनांमुळे २०२४ मध्ये ते पुन्हा पंतप्रधान होतील. माननीय मोदीजींच्या २०२४ मधील या विजयासाठी महायुतीच्या सर्वच घटक पक्षांचे योगदान अपेक्षित आहे. त्यामुळे मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर सर्वांनी मोदीजींच्या विक्रमी विजयासाठी संकल्पबद्ध व्हावे, असे आवाहन यावेळी करून चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी सोलापूर जिल्ह्यातील महायुतीचे सर्व नेते उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.