सोलापूर येथे होणाऱ्या १०० व्या नाट्यसंमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांची घेतली भेट

7

सोलापूर : अखिल भारतीय नाट्य परिषदेतर्फे सोलापुर येथे लवकरच शतक महोत्सवी विभागीय मराठी नाट्य संमेलन होत आहे. या संमेलनाचे निमंत्रण देण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमारजी शिंदे यांची भेट घेतली.

सुशीलकुमारजी हे ८८ व्या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यामुळे, १०० वे नाट्यसंमेलन यशस्वी होण्यासाठी आपले बहुमूल्य मार्गदर्शन प्रार्थनीय आहे, अशी विनंती पाटील यांनी केली. तसेच, या संमेलनाच्या यशाकरिता आपल्याकडून सर्वोतोपरी सहकार्य लाभावे अशी भावना देखील त्यांनी याप्रसंगी व्यक्त केली. यावेळी नाट्य परिषदेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सोलापूरचे नाट्य संमेलन २० ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत होणार आहे. हे नाट्यसंमेलन १०० वे असल्याने सर्व सोलापूरकरांच्या सहकार्यातून दर्जेदार नाटकासह येथे येणाऱ्या सर्वांना उत्कृष्ट सोयी सुविधा देऊन संपूर्ण देशभरात आदर्शवत ठरेल असे संमेलन केले जाणार आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.