भारतीय जनता पक्षाची प्रतिमा जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे, ही प्रत्येकाची जबाबदारी – चंद्रकांत पाटील

4
सोलापूर : भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी यांच्या सह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापूर लोकसभा मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते, पदाधिकारी व भाजपा सुपर वॉरियर्स यांच्या मेळाव्याला संबोधित केले.
यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले कि, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी पक्षाने ज्या गोष्टींचे आश्वासन दिले, त्या गोष्टी पूर्ण केल्या. काश्मीर मधील ३७० कलम यापूर्वीच हटविण्यात आले आहे. आता अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारले जात आहे. हीच भारतीय जनता पक्षाची प्रतिमा जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवणे, ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी चंद्रकांत पाटील यांनी केले.

यावेळी खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, सुभाष देशमुख, विजय देशमुख, जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, राजेश पांडे, उदय पाटील, शहराध्यक्ष नरेंद्र काळे, मोहन डांगरे यांच्या सह पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.