सोलापूर : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आज सोलापूर दौऱ्यावर आहेत. देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी विविध विकासकामांच्या लोकार्पणासाठी १९ जानेवारी रोजी सोलापुरात येत आहेत. त्यांच्या स्वागताच्या नियोजनाचा आढावा आज सोलापुर पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सह घेतला. तसेच त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या ‘दीवार लेखन’ अभियानांतर्गत सोलापूर मधील बूथ क्रमांक १५ येथे ‘एक बार फिर से मोदी सरकार’ या घोषवाक्याचे लेखन देखील केले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने प्रत्येकाच्या काळजावर आपले नाव कोरले आहे. आज ‘दीवार लेखन’ अभियानाचे औचित्य साधून मोदीजींच्या नावाचा जयघोष लेखणीद्वारे मांडताना अतिशय आनंद वाटला असल्याचे पाटील म्हणाले.
यावेळी आ. सुभाष देशमुख, विजय देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, मोहन डांगरे यांच्या सह पक्षाचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.