सोलापूर : सोलापूरमधील प्रसिद्ध उद्योजक बालाजी अमाईन्स व बालाजी सरोवरचे प्रमुख राम रेड्डी यांची आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली. यावेळी बालाजी अमाईन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाचे लोकप्रिय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी उद्या आपल्या सोलापूर शहरात येणार आहेत. या भेटीत १५ हजार श्रमिकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेतून उभारण्यात आलेल्या रे नगर प्रकल्पाचे लोकार्पण करणार आहेत. त्यामुळे आपण सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे पाटील यांनी म्हटले.
तसेच जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात सोलापुरात शतक महोत्सवी विभागीय नाट्यसंमेलन होणार आहे. या महोत्सवाच्या माध्यमातून अनेक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सोलापुरकरांना अनुभवायला मिळणार आहे. या महोत्सवाचा आपणही सर्वांनी आनंद घ्यावा, असे आवाहन देखील पाटील यांनी याप्रसंगी केले.