पुणे : वसंतोत्सव म्हणजे पुणेकर रसिकांसाठी जणूकाही स्वरांची मेजवानीच! शास्त्रीय संगीत गायक पंडित डॉ.वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गायक राहुल देशपांडे यांच्या पुढाकारातून दरवर्षी वसंतोत्सव साजरा होत असतो. यंदाचा वसंतोत्सव जल्लोषात पार पडला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
यंदा प्रभू श्रीरामचंद्रांच्या आगमनामुळे संपूर्ण देशात चैतन्याचे वातावरण आहे. त्यामुळे यंदाच्या वसंतोत्सवात सर्वजण प्रभू श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन झाले होते. चंद्रकांत पाटील यांनी आज या कार्यक्रमास उपस्थित राहून गायक राहुलजी देशपांडे यांनी गायलेले ‘राम नाम जप प्यारे’ या गीताचे प्रकाशन केले.
कोथरूड येथील सूर्यकांत काकडे फार्म येथे हा कार्यक्रम संपन्न झाला. १९ ते २१ जानेवारी असे तीन दिवस या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राहुल देशपांडे आणि महेश काळे यांच्या गाण्यांनी सारेच रसिक मंत्रमुग्ध झाले होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.