पुणे : अयोध्येत प्रभू श्रीरामांची मोठ्या आनंदाच्या आणि भक्तीमय वातावरणात प्राणप्रतिष्ठापना झाली. हा क्षण म्हणजे कोट्यवधी भारतीयांसाठी इच्छापूर्तीचा, आनंदाचा आणि अभिमानाचा क्षण होय. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरुड मतदारसंघातील मृत्यूंजयेश्वर मंदिरात हा सोहळा दुरदृश्यप्रणालीद्वारे पाहिला. हा सोहळा पाहत असताना मन अतिशय गहिवरून आले असल्याचे पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले कि, ज्या उद्देशाने सामाजिक जीवनात काम करायला सुरुवात केली, आज तो उद्देश पूर्ण होत असताना पाहून मनात समाधानाच्या भावना दाटून आल्या. रामलल्लाच्या दर्शनाने आज जन्म सार्थकी लागून जीवन धन्य झाल्याची अनुभूती मिळाली, असे पाटील म्हणाले.
अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याचे उद्घाटन झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आदी मान्यवर या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित होते . तब्बल 500 वर्षांची प्रतिक्षा फळाला आली अन् अवघ्या देशवासियांच्या मनातील इच्छा पूर्ण झाली. अयोध्येतील भव्य दिव्य राम मंदिरात प्रभू श्रीराम विधीवत विराजमान झाले.