कोथरूडच्या स्वप्नशिल्प सोसायटीच्या वार्षिकोत्सवात चंद्रकांत पाटील यांची हजेरी… विविध स्टॉल्सना भेटी देत त्यांनी दिले स्टॉल्स धारकांना प्रोत्साहन

पुणे : ४८४ सदनिकांची कोथरूडची स्वप्नशिल्प सोसायटी ही या भागातली एक मोठी आणि प्रतिष्ठित गृहरचना संस्था आहे. मोठ्या सभासद संस्थेमुळे सोसायटीत नेहमीच विविध कार्यक्रम आणि उपक्रमांची रेलचेल असते. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी सोसायटीत दिनांक २० आणि २१ जानेवारीला वार्षिकोत्सव साजरा झाला. या आधीच्या महिन्याभरात सोसायटीत विविध क्रिडाप्रकारांच्या स्पर्धा आयोजित केल्या गेल्या होत्या. अबालवृद्धांचा अभूतपूर्व सहभाग हे यावर्षीच्या क्रिडामहोत्सवाचे वार्षिकोत्सवाचे विशेष वैशिष्ट्य. विविध खाद्यपदार्थांचे आणि हस्तकला वस्तूंचे स्टॉल्स हे या उत्सवाचे मोठेच आकर्षण होते. दोन दिवस सोसायटी मधील आणि बाहेरील कलाकारांनी मनोरंजनाचे मनोवेधक कार्यक्रम सादर केले.
या कार्यक्रमाच्या या महोत्सवात उत्साहाची परिसीमा गाठली गेली ती स्थानिक आमदार आणि राज्याचे तंत्रआणि उच्चशिक्षण मंत्री माननीय चंद्रकांतदादा पाटील यांच्या भेटीने. चंद्रकांत दादांनी या वार्षिकोत्सवास भेट देऊन विविध स्टॉल्सनख भेटी देत त्या स्टॉल धारकांना प्रोत्साहन दिले. या महोत्सवात खमंग आणि मसालेदार खाद्यपदार्थांची चव घेण्याचा आणि काही स्टॉलवरून खरेदी करण्याचा मोह दादांनाही आवरता आला नाही. दोन दिवसांच्या या आनंदोत्सवाची सांगता दादांच्या भेटीने झाली असं म्हणलं तर अयोग्य ठरणार नाही. यावेळी भाजपचे पुनीत जोशी, संदीप खर्डेकर, केतन महामुनी, दिग्विजय जोशी आदी पदाधिकारी देखील उपस्थित होते.
व्यवस्थापन समितीचे सदस्य, सोसायटीचे पदाधिकारी आणि सोसायटीतील तरुणाईने या वार्षिकोत्सवाचे आयोजन अत्यंत रेखीव पद्धतीने केले आणि तो यशस्वी करण्यासाठी अपार मेहनतही घेतली. सोसायटीतील रहिवाशांनी देखील अपेक्षेबाहेर आपली उपस्थिती लालतआणि या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन या परिश्रमांची एक प्रकारे पावतीच दिली.