महिला स्वयंसहाय्यता बचतगट उत्पादित वस्तू व खाद्यप्रदर्शन जिल्हास्तरीय विक्री केंद्र आणि प्रदर्शनाचे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन संपन्न
सोलापूर : महिला आर्थिक विकास महामंडळ, सोलापूर व राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बॅंक, सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आलेल्या महिला स्वयंसहाय्यता बचतगट उत्पादित वस्तू व खाद्यप्रदर्शन जिल्हास्तरीय विक्री केंद्र आणि प्रदर्शनाचे आज पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले.
पाटील यांनी माहिती दिली कि, नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला विकास प्रकल्पाअंतर्गत हा स्वयंसहाय्यता बचतगट सुरू करण्यात आला आहे. महिला सक्षमीकरणासाठी जिल्हा नियोजन मधून ८० महिलांना स्वयंरोजगारासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. त्याचे प्रातिनिधिक स्वरूपात आज पाटील यांनी दोन महिलांना धनादेश हस्तांतरित केले.
अमरावतीच्या धर्तीवर ग्रामीण भागातील महिलांनी तयार केलेल्या उत्पादनांच्या खरेदीसाठी एखादे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी संबंधितांना केल्या.