पोलीस परेड ग्राउंड येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण संपन्न

19
सोलापूर : भारतीय प्रजासत्ताकदिनाच्या ७४ व्या वर्धापनदिनानिमित्त सोलापूर शहर पोलीस कवायत मैदान येथे आयोजित शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. याप्रसंगी सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन भारतीय प्रजासत्ताक चिरायू होवो अशी सदिच्छा पाटील यांनी व्यक्त केली.
महात्मा ज्योतीराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना या अंतर्गत जिल्ह्यात 7 लाख 92 हजार गोल्डन कार्ड तयार करण्यात आली आहेत. या लाभार्थ्यांना प्रति वर्षी, प्रतिकुटुंब 5 लाखाचा आरोग्य विमा कवच उपलब्ध करून देण्यात आले आहे. ही सेवा जिल्ह्यातील 51 व जिल्हयाबाहेरील अंगीकृत रुग्णालयांमध्ये मिळत आहे. या अंतर्गत शासनाकडून जिल्ह्यातील जवळपास आठ लाख कुटुंबांना वैद्यकीय उपचारासाठी विमा कवच उपलब्ध करून ‘सर्वांसाठी आरोग्य’ ही संकल्पना जोपासली असल्याचे प्रतिपादन चंद्रकांत पाटील यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, महापालिका आयुक्त शीतल तेली- उलगे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांच्या सह सर्व शासकीय आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.