सोलापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शतक महोत्सवी विभागीय नाट्यसंमेलन सोलापुरात आजपासून सुरु होत आहे. या नाट्यसंमेलनाच्या रूपाने सोलापूर मधील रंगकर्मींच्या कलागुणांना चालना देणारे एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यासोबतच सोलापूर मधील कलाकारांनाही आपली कला सादर करता यावी, यासाठी जिल्हा आर्टिस्ट असोसिएशनच्या वतीने चित्र प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाचे शुक्रवारी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. तसेच नाट्य संमेलनाच्या पूर्वसंध्येला पाटील यांनी रंगमंचाचे पूजन करुन शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चित्र प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले ,यावेळी सोलापूर मधील कलाकारांचे कलागुण आणि प्रतिभा पाहून पाटील यांना प्रचंड आनंद झाला. विभागीय नाट्य संमेलनाच्या निमित्ताने शहरातील नाट्यकर्मी मंडळींनी जुळे सोलापुरात हक्काचे नाट्यगृह असावे, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याला महापालिकेकडूनही मान्यता मिळाली असून, लवकरच त्याचे काम सुरू होईल, असे रंगमंचाचे पूजन झाल्यावर पाटील यांनी आश्वस्त केले.
यावेळी शिवाजीराव सावंत, दादा साळुंखे, प्रकाश येलगुलवार, दत्ता आण्णा सुर्वसे, मोहन डांगरे, अविनाश महागावकर, प्रशांत बडवे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.