पारंपरिक लोककलांनी निघाली नाट्य दिंडी; नाट्य कलावंतांसह पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा समावेश

19

सोलापूर, २७ जानेवारी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे शतक महोत्सवी विभागीय नाट्यसंमेलन आजपासून सोलापुरात सुरु झाले आहे. या नाट्यसंमेलनाच्या निमित्ताने आज सोलापुरात भव्य नाट्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. या दिंडीला सोलापुरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

पारंपरिक लोककलांनी व ढोल, ताशा, लेझीम, भगवे – लाल  फेटे, रांगोळ्यांच्या पायघड्या आणि नाट्य कलाकारांच्या उपस्थितीत १०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नाट्य दिंडी आज बलिदान चौक ते नॉर्थ कोट मैदान पर्यंत  निघाली.
नाट्य दिंडीत  नाट्य कलावंतांसोबत  तसेच पारंपरिक लोक कला असलेल्या वासुदेव, पोतराज, गोंधळी, बहुरूपी तसेच मानाचे नंदीध्वज, वारकरी, बहुरंगी वेशभूषेतील लोककलाकारांच्या लोककलेने ही नाट्य दिंडी सजली होती. ही नाट्य दिंडी पाहण्यासाठी सोलापूरकरांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती.
यावेळी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांतजी दामले, मोहन जोशी यांच्या सह अनेक दिग्गज अभिनेते अभिनेत्री या संमेलनासाठी सिद्धेश्वरनगरीत उपस्थित सुभाषबापू होते. या संमेलनामुळे नाट्यप्रेमी सोलापूरकरांचा आनंद द्विगुणित झाला आहे.

Get real time updates directly on you device, subscribe now.