पुणे : कोथरुड मतदारसंघात सकल हिंदू टाईम्स आणि क्रिएटिव्ह फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्राचा लेखाजोखा या विषयावर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. या व्याख्यानमालेस उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, वरिष्ठ राजकीय विश्लेषक सुशील कुलकर्णी यांनी यावेळी आपले विचार मांडताना २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत मतदारांनी मतदान करताना, २०१४ पासून संपूर्ण जगात आपल्या भारताची प्रतिमा ज्या पद्धतीने उजळली आहे, त्याचा विचार करुन मतदान करावे असे आवाहन केले. तसेच, प्रत्येक लोकसभा मतदारसंघात मा. नरेंद्र मोदीजी हेच उमेदवार असणार आहेत, असे मानूनच मतदान करावे, असे आवाहन याप्रसंगी केले. याप्रसंगी कोथरुडकर बहुसंख्येने उपस्थित होते.
Get real time updates directly on you device, subscribe now.