पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील आपल्या मतदारसंघातील नागरिकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतात. कोथरूड मधील नागरिकांसाठी मनोरंजनाचे कार्यक्रम ते आयोजित करत असतात. कधी नाटकाचे प्रयोग तर कधी मोफत चित्रपटाचा आनंद मिळण्यासाठी ते पुढाकार घेतात. आजही त्याची कोथरूड मधील महिलांसाठी खास करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनाची विशेष व्यवस्था केली.
पाटील यांनी याबाबत माहिती दिली कि, मकर संक्रांतीनिमित्त कोथरुड मतदारसंघातील बाणेर भागातील भगिनींनी करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या दर्शनाची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार समुत्कर्ष फाऊंडेशनच्या माध्यमातून आज या सर्व माता भगिनींसाठी आई अंबाबाईच्या दर्शनाची विशेष व्यवस्था केली. आई अंबाबाईच्या लेकरांना दर्शनासाठी व्यवस्था करून देण्याचे भाग्य मला लाभले याचा विशेष आनंद आणि समाधान वाटते.