जिओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या गारटेक्स-टेक्स प्रोसेस इंडिया या प्रदर्शनाचे उदघाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न
मुंबई : मुंबईतील वांद्रे येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेशन सेंटर येथे आयोजित करण्यात आलेल्या गारटेक्स-टेक्स प्रोसेस इंडिया या प्रदर्शनाचे उदघाटन आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, या प्रदर्शनात जवळपास ३० कंपन्यांनी सहभाग घेतला असून प्रदर्शन पुढील ३ दिवस सुरू राहणार आहे. पाटील यांनी संपूर्ण प्रदर्शन पहिले आणि सवाना शुभेच्छा दिल्या.
या उद्घाटन कार्यक्रमास वस्त्रोद्योग विभागाचे सचिव वीरेंद्र सिंह, उपसचिव श्रीकृष्ण पवार, अमर अख्तर, शरद जैनपुरिया, सिमॉन-ली, हिमानी गुलाटी आदी मान्यवर उपस्थित होते.