जागतिक पातळीवर माय मराठीचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा होणारा सन्मान हा अतिशय आनंद देणारा वाटतो –  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

4

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले म्हणजे अखंड महाराष्ट्राची श्रद्धास्थान! महाराजांच्या आणि शूरवीर मावळ्यांच्या पराक्रमाची यशोगाथा सांगणाऱ्या गड किल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासन प्रयत्नशील असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

चंद्रकांत पाटील यांनी याबाबत माहिती देताना सांगितले कि, गडकिल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा मिळून या गडकिल्ल्यांना जागतिक पातळीवर ओळखले जावे यासाठी युनेस्को हेरीटेज लिस्ट 2024-25 करिता केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने यंदा मराठा लष्करी रणभूमीचा परिसर अर्थात गडकिल्ल्यांला नामांकन दिले आहे. या नामांकनामध्ये महाराष्ट्रातील साल्हेर किल्ला, शिवनेरी किल्ला, लोहगड, खांदेरी किल्ला, किल्ले रायगड, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा किल्ला, विजय दुर्ग, सिंधुदुर्ग आणि तामिळनाडूतील जिंजीचा किल्ला, अशा बारा किल्ल्यांचा समावेश आहे. हा प्रस्ताव बुधवारी भारत सरकारच्या वतीने युनेस्को जागतिक वारसा संचालक एलौंडोऊ असोमो यांना सादर करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी मराठीत बोलून या प्रस्तावाचा स्वीकार केला व आभार व्यक्त केले.
हा प्रस्ताव सादर करताना भारताचे युनेस्को प्रतिनिधी विशाल शर्मा यांनी देखील मराठीत भूमिका मांडली! जागतिक पातळीवर माय मराठीचा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा होणारा सन्मान हा अतिशय आनंद देणारा वाटतो, असे मत चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.