गेटवे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून महाकाव्य रामायण या कार्यक्रमाचे आयोजन… कार्यक्रमास मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती

13
मुंबई : मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथे महाराष्ट्र राज्याच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून महाकाव्य रामायण या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महाकाव्य रामायण या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, काही दिवसांपूर्वी अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिरात श्रीराम लल्ला विराजमान झाले असताना महाकाव्य रामायण सादरीकरण पाहताना मन भक्ती रसात न्हाऊन निघाले. “महाकाव्य रामायण” यावर आधारीत ग. दि. माडगुळकर सिध्दहस्ताने आणि सुधीर फडके यांच्या वाणीतून अजरामर झालेले गीत रामायण “सांस्कृतिक कार्य विभाग” यांच्या माध्यमातून सादर करण्यात आले. संगीत, नाट्य, नृत्य व गायन या कलाविष्कारांनी परिपूर्ण असणारा हा कार्यक्रम म्हणजे स्वर्ग अनुभूतीच!
या कार्यक्रमास महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर , गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, मंत्री सुधीर मुनगंटीवार यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.