‘फॅमिली वॉकेथॉन’ या स्पर्धेत वैभव संपन्न एकत्र कुटुंब परंपरेचे आगळे-वेगळे रुप पाहताना अतिशय आनंद झाला – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

16
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कोथरुड मतदारसंघातील बाणेरमध्ये नमो करंडकाच्या माध्यमातून भाजपा कोथरुड उत्तर मंडलच्या वतीने फॅमिली वॉकेथॉन ही सहकुटुंब सहभागी होण्याची अनोखी स्पर्धा आयोजित केली. भारतीय कुटुंब व्यवस्था ही भारतीय समाजाचा आणि भारतीय संस्कृतीचा कणा आहे. आपली ही वैभव संपन्न परंपरा ही आपली दौलत आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात आणि व्यस्त दिनचर्येमुळे कुटुंबाला एकत्रित वेळ घालवणे शक्य होत नाही. म्हणून, या फॅमिली वॉकेथॉन चे आयोजन करण्यात आले असल्याचे पाटील यांनी म्हटले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, या स्पर्धेत वैभव संपन्न एकत्र कुटुंब परंपरेचे आगळे-वेगळे रुप पाहताना अतिशय आनंद झाला. या फॅमिली वॉकेथॉन मध्ये बाणेरमधील एक अन् एक कुटुंब सहभागी झाले होते. त्यामुळे या स्पर्धेला एकाद्या सोहळ्याचे स्वरूप आले. अगदी अबाल वृद्ध, माता-भगिनी सर्वांनीच वॉकेथॉन मध्ये सहभागी होऊन; कुटुंबाच्या एकीचा आनंद मनमुरादपणे लुटला. या कौटुंबिक कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी दूरध्वनीवरून संवाद साधून बाणेरकरांच्या उत्साहाला अभिवादन केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.