चंद्रकांत पाटील यांनी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या घरी भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देशात सुरू असलेल्या सुशासन पर्वाची दिली माहिती
पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्र सरकार तसेच राज्य सरकारने केलेली कामे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी. नड्डा जी यांनी प्रत्येक वॉर्डात ‘बुथ चलो अभियान’ सुरू करण्याची घोषणा केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघात हे अभियान राबवत जनतेला सुशासन पर्वाची माहिती दिली.
चंद्रकांत पाटील यांनी रविवारी आपल्या कोथरुड मतदारसंघात असलेल्या डहाणूकर कॉलनी भागातील बूथ क्रमांक ३१८ आणि ३२० या क्रमांकाच्या बूथ वरील नागरिकांच्या घरी भेट देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात देशात सुरू असलेल्या सुशासन पर्वाची माहिती दिली. यावेळी प्रामुख्याने रोहित फडणीस, नवनाथ साठे, डॉ.सुधीरकुमार मुंडले, अमित चितळे यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला.
याप्रसंगी दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, भाजपा नेते शाम देशपांडे, नवनाथ जाधव, गिरीश भेलके, सरचिटणीस गिरीश खत्री, दिपक पवार, माजी नगरसेविका हर्षाली माथवड, बाळासाहेब दांडेकर, बूथ अध्यक्ष मंगेश देशपांडे, विठ्ठल आण्णा बराटे, प्रभाग क्रमांक १२ चे अध्यक्ष अंबादास अष्टेकर, दिनेश माथवड यांच्या सह भाजपचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.