लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या ‘वॉल पेंटिंग’ अभियानात चंद्रकांत पाटील यांचा सहभाग

9
पुणे : भाजपाचे येणारे पर्व हे ऐतिहासिक पर्व असून जनहिताचे आणि देशहिताचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून भाजपाची वाटचाल सुरू आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भाजपाच्या माध्यमातून ‘वॉल पेंटिंग’ अभियान राबवले जात आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी रविवारी या अभियानात सहभाग घेतला.
चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कोथरुड मतदारसंघातील डहाणूकर कॉलनी भागात भाजपाचे चिन्ह असलेल्या कमळाच्या फुलाचे चित्र रेखाटून या अभियानाला प्रतिसाद दर्शवला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र आता जोरदार तयारी सुरु आहे. भाजपकडून वेगवेगळे अभियान राबविले जात आहे.
यावेळी दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, भाजपा नेते शाम देशपांडे, नवनाथ जाधव, गिरीश भेलके, सरचिटणीस गिरीश खत्री, दिपक पवार, अभियान प्रमुख विठ्ठल आण्णा बराटे, बूथ अध्यक्ष मंगेश देशपांडे, प्रभाग क्रमांक १२ चे अध्यक्ष अंबादास अष्टेकर, दिनेश माथवड यांच्या सह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.