सर्व नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आश्वासन

24
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून जनता दरबार आयोजित करून कोथरूड आणि बाणेर मधील नागरिकांशी संवाद साधला. यावेळी अनेकांनी आपले शासकीय व सार्वजनिक प्रश्न मांडले. दरम्यान सर्व नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन त्यांना त्यांची कामे वेळेत पूर्ण करण्याचे पाटील यांनी आश्वासन दिले.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, जनता दरबारामुळे नागरिकांशी थेट संपर्क होऊन त्यांची कामे मार्गी लागतात तेव्हा अत्यानंद होतो. तसेच नागरिकांच्या चेहऱ्यावरील आनंदाचा भाव मनाला समाधान देऊन जातो. अशा प्रकारच्या कार्यक्रमांतून जगण्यासाठी केवळ पैसा नाही तर माणुसकी आणि समाधान तितकंच महत्वाचं आहे याची प्रचिती येते

Get real time updates directly on you device, subscribe now.