राज्याच्या अर्थव्यवस्थेत वस्त्रोद्योग क्षेत्राची महत्त्वाची भूमिका; या घटकांना चालना देण्यासाठी शासन सकारात्मक – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील
वीज बिलातील पोकळ थकबाकी वरील व्याज रद्द करणे,सौर ऊर्जा वापर, सौर ऊर्जा प्रकल्प उभारणी, नवीन वीज जोडणीसाठी ऑनलाईन नोंदणी एक वेळची निर्गम योजना, राज्यातील यंत्रमागांची गणना, अल्पसंख्यांक यंत्रमाग धारक, मिनी टेक्स्टाईल पार्क योजना राबविणे, भांडवली अनुदान, एक जिल्हा एक उत्पादन(ओडीओपी ), टेस्टिंग लॅब, आपत्कालीन व्यवस्था, मूलभूत पायाभूत सुविधा, उद्योग भवन उभारणे, सांडपाणी प्रक्रिया, आयात माल, यंत्रमाग पुनर्स्थापना याबाबत सकारात्मक चर्चा करून यंत्रमाग कामगार कल्याण मंडळ स्थापन करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे शिफारस करण्यात येईल. मल्टी पार्टी वीज जोडणी बाबतही उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शिफारस करण्यात येईल असे पाटील यांनी यावेळी सांगितले.
या समितीचे अध्यक्ष तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार राईस शेख, प्रवीण दटके, मंत्री सुभाष देशमुख हे समितीचे सदस्य तर व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळ हे सदस्य सचिव आहेत.