पुण्यातून आस्था ट्रेनने राम भक्तांचे अयोध्येकडे प्रयाण… भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
पुणे : तब्बल ५०० वर्ष रामभक्तांच्या साधनेमुळे २२ जानेवारी रोजी श्री क्षेत्र अयोध्येतील भव्य मंदिरात प्रभू श्रीरामांचे आगमन झाले. यानुषंगाने प्रत्येकालाच प्रभू रामल्लांच्या दर्शनाची ओढ लागली आहे. म्हणूनच, आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आणि भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी नड्डाजी यांच्या संकल्पनेतून सर्व जिल्ह्यातील रामभक्तांसाठी भारतीय जनता पक्षाने दर्शनासाठी विशेष व्यवस्था केली आहे. त्यानुसार, पुण्यातून आस्था ट्रेनने अयोध्येकडे प्रयाण केले. याप्रसंगी पुणे रेल्वे स्थानक येथे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, वास्तविक आपल्याकडे ज्याप्रमाणे आषाढी-कार्तिकीला श्री क्षेत्र पंढरपूर येथे विठूरायाच्या दर्शनाची ओढ लागली असते तशीच ओढ पुण्यातून अयोध्येकडे जाणाऱ्या रामभक्तांमध्ये होती. त्यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना आपण भक्तीभावाने नमस्कार करतो तशीच भावना अयोध्येत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या प्रत्येक रामभक्तांप्रती होती. त्यामुळे सर्व रामभक्तांना नमस्कार करुन आमचा ही नमस्कार प्रभू श्रीरामांच्या चरणी पोहोचवावा. तसेच, रामल्लांच्या दर्शनाचा योग माझ्या सारख्या अन्य ही रामभक्तांना लवकरच घडावा, अशी प्रार्थना पाटील यांनी याप्रसंगी केली.