गांव चलो अभियानाच्या निमित्ताने आज नाणेगावचे प्रगतीशील शेतकरी यशवंत गायकवाड यांच्या नर्सरी शेताला चंद्रकांत पाटील यांनी दिली भेट

13
पुणे : पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ‘गावाकडे चला’ची साद घातली आहे. त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डाजी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या भाजपाच्या ‘गांव चलो अभियानात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सहभाग घेतला. गांव चलो अभियानाच्या निमित्ताने आज पाटील यांनी नाणेगावचे प्रगतीशील शेतकरी यशवंत गायकवाड यांच्या नर्सरी शेताला भेट दिली.  शेती आणि शेतकरी हा नेहमीच माझ्या जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे असे पाटील यांनी म्हटलं.

चंद्रकांत पाटील यांनी गायकवाड यांच्या शेतीची पाहणी करून ते लागवड करत असलेल्या पिकांची माहिती घेतली. यशवंतराव शेतीतून आपले उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक अभिनव प्रयोग करत आहेत. त्यामध्ये माननीय मोदीजींच्या योजनांचा लाभ होत आहे, हे ऐकून अतिशय आनंद झाला असल्याचे मत पाटील यांनी व्यक्त केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.