विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांच्यासमवेत उच्च व तंत्र शिक्षणातील शैक्षणिक सुविधा आणि नवीन धोरण अंमलबजावणीबाबत मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत चर्चा
मुंबई : हॉटेल ट्रायडंट येथे विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष जगदीश कुमार यांच्या समवेत महाराष्ट्रातील उच्च व तंत्र शिक्षणातील शैक्षणिक सुविधा आणि नवीन शैक्षणिक धोरण अंमलबजावणी बाबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सविस्तर चर्चा करण्यात आली. दरम्यान, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी स्वयंमच्या धर्तीवर राज्यामध्ये महास्वयंम प्लॅटफॉर्म विकसित करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे असे पाटील यांनी नमूद केले.
विद्यापीठात नेमणूक करतेवेळी अध्यापकांना पदव्युत्तर पदवी आणि नेट/सेट अथवा पीएच.डी हीच शैक्षणिक अर्हता लागू राहील याबाबत आयोगाकडून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल.