पुणे : भारतीय जनता पार्टीच्या वतीने नेहमीच नागरिकांसाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात.आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंदक्रांत पाटील यांनी भाजपाच्या ‘गाव चलो अभियानांतर्गत’ नाणेगावातील महिला बचत गटाच्या माता भगिनींशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील यांनी देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात संपूर्ण देशात महिला सक्षमीकरणासाठी सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती यावेळी दिली. तसेच, कोथरुड मध्येही महिलांसाठी सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वबळावर उभं राहायला प्रोत्साहन मिळत असतं. म्हणून महिलांना बचत गटाच्या माध्यमातून कोणताही लघु उद्योग सुरू करायचा असल्यास त्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही यावेळी चंद्रकांत पाटील यांनी दिली.