गेल्या दीड वर्षात राज्यातील विकासाला गती मिळाली असून राज्यासह पुण्यातील अनेक पायाभूत सुविधांचा विकास शासनाने केला आहे – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

14
पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील ससून रुग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरीता नूतन निवासी इमारत, महात्मा गांधी पूलगेट बसस्थानकाचे आधुनिकीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचा विकास, संगम घाटावरील संगमेश्वर गणेश विसर्जन घाट नूतनीकरण व नागरिकांसाठी निवारा केंद्र, आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बॉटनिकल उद्यानाचे  भूमिपूजन राज्याचे लोकप्रिय आणि कार्यक्षम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी संपन्न झाले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

कॅन्टोन्मेंट मतदारसंघात विकासकामे मंजूर होताना, यासाठी परवानगी हा अतिशय जटिल विषय असतो. आमदार सुनील कांबळे यांनी सातत्याने पाठपुरावा करुन सर्व परवानग्या मिळवल्या. २०१४ ते २०१९ या कालावधीत देवेंद्रजी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असताना राज्यात पायाभूत सुविधांचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. दोन वर्ष राज्यातील विकास पर्वाला दृष्ट लागल्याने, सर्व ठप्प झाले होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वात पुन्हा याला गती मिळाली आहे. समृद्धी महामार्ग आणि अटल सेतू मुळे दळणवळण अतिशय जलद झाले आहे. पुण्यातील अनेक प्रकल्प देखील पूर्ण झाले असून, त्याचे लवकरच लोकार्पण होईल, असे याप्रसंगी चंद्रकांत पाटील यांनी आश्वास्त केले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, गेल्या दीड वर्षात राज्यातील विकासाला गती मिळाली असून राज्यासह पुण्यातील अनेक पायाभूत सुविधांचा विकास शासनाने केला आहे. लहुजी वस्तादांच्या स्मारकाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असे सांगून ससून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या निवासाच्या इमारती व पुणे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसरातील सुशोभीकरण ही कामे महत्त्वपूर्ण असल्याचे  पाटील यांनी सांगितले.
यावेळी आमदार भीमराव तापकीर, माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, माजी मंत्री दिलीप कांबळे, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार योगेश मुळीक, योगेश टिळेकर, माजी महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.