श्रीक्षेत्र आळंदी येथे आयोजीत करण्यात आलेल्या गीत गोविंद संत सज्जन मेळ्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती
पुणे: श्री क्षेत्र अयोध्या येथील प्रभू श्रीरामांच्या मंदिराचे कोषाध्यक्ष पूजनीय गोविंदगिरीजी अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. यानिमित्त श्रीक्षेत्र आळंदी येथे आयोजीत करण्यात आलेल्या गीत गोविंद संत सज्जन मेळ्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी कांची कामकोटि पीठाधीश्वर पूजनीय शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांच्या आशीर्वादाने कृतार्थ झालो असल्याचे पाटील यांनी म्हटले.
स्वामी श्री गोविंददेव गिरी यांच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त त्यांना शुभेच्छा देऊन पाटील म्हणाले, गीता परिवार, महर्षी वेद व्यसास प्रतिष्ठान, श्रीकृष्ण सेवा निधी आणि संत श्री ज्ञानेश्वर गुरूकुलाच्या माध्यमातून स्वामीजींनी गेली अनेक वर्षे भारतीय संस्कृती, आध्यात्मिक परंपरा, वेदवाङ्मयाबाबत देशविदेशात प्रबोधनाचे काम केले आहे. व्रतस्थ वृत्तीने त्यांचे कार्य आजही सुरू आहे. आध्यात्मिक मूल्यांचे पालन, संवर्धन करतांना त्यांनी आध्यात्म विचार सर्वदूर पोहोचविला. यावेळी अन्य मान्यवरांनी विचार व्यक्त केले.