भावी पिढीमध्ये गड किल्ले यांच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होईल असा विश्वास वाटतो – चंद्रकांत पाटील

6
पुणे : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा कोथरूड मतदार संघाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिवाळीत आयोजीत केलेल्या किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांना शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यातील गडकोट किल्ल्याची सहल घडविण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार, आज लोहगडसाठी कोथरुड मधील बाल मित्र रवाना झाले. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून बालमित्रांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.
चंद्रकांत पाटील यांनी माहिती दिली कि, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महापराक्रमामुळे महाराष्ट्राला गड-किल्ल्यांचे वैभव लाभले आहे. हे गड किल्ले आपल्या अस्मितेची ओळख आहेत. नव्या पिढीला गड-किल्ल्यांची तर विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची माहिती व्हावी, या हेतूने चंद्रकांत पाटील यांनी आपल्या कोथरूड मतदारसंघात दिवाळीत किल्ले बनवा स्पर्धेचे आयोजन केले होते.
चंद्रकांत पाटील यांनी त्या स्पर्धेतील विजेत्यांना रवाना करताना उपस्थित राहून या बाल मित्रांना प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या पुढाकारामुळे भावी पिढीमध्ये गड किल्ले यांच्या संवर्धनाबाबत जागरूकता निर्माण होईल असा विश्वास वाटतो, असे पाटील यांनी म्हटले.

Get real time updates directly on you device, subscribe now.