श्री प्रल्हाद दादा वामनराव पै यांचे जीवनाकडे पाहण्याचे विचार ग्रहण करताना अतिशय साध्या सोप्या पद्धतीने जीवनाकडे पाहण्याची दिशा मिळाली – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे : जीवन विद्या मिशन ही समाजाच्या उत्कर्षासाठी आणि उन्नतीसाठी कार्य करणारी संस्था आहे. सद्गुरू वामनराव पै हे १९५५ सालापासून ह्या संस्थेच्या माध्यमातून जीवन विद्येचे तत्त्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. हे वर्ष सदगुरू श्री वामनराव पै यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. त्यानिमित्त पुण्यात ‘तुमचा उत्कर्ष तुमच्या हातात’ या विषयावर सद्गुरुंचे सुपूत्र तथा जीवन विद्या मिशनचे आजीव विश्वस्त श्री. प्रल्हाददादा वामनराव पै यांचे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली.
प्रल्हाददादा वामनराव पै यांचे विचार ऐकण्यासाठी पुणे जिल्ह्यातून हजारो साधकांचा जनसागर या कार्यक्रमास उपस्थित होता. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला याचा विशेष आनंद वाटत असल्याचे पाटील यांनीं म्हटले. श्री प्रल्हाद दादांचे जीवनाकडे पाहण्याचे विचार ग्रहण करताना अतिशय साध्या सोप्या पद्धतीने जीवनाकडे पाहण्याची दिशा मिळाली असल्याचे पाटील यांनी म्हटले.
कृतज्ञता आणि सामंजस्य या दोन संकल्पना प्रत्येक व्यक्तीने आपल्या जीवनात अंगिकारले, तर जीवन अतिशय सुसह्य होईल, हा उमगलेला विचार अतिशय प्रेरणादायी असल्याचे पाटील म्हणाले.