उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते चतु:शृंगी परिसरातील दीड कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन

पुणे : चतु:शृंगी म्हणजे सर्व पुणेकरांचे श्रद्धास्थान! नाशिकमधील वणीच्या सप्तशृंगी देवीचे प्रतिरुप म्हणून ही चतु:शृंगी प्रचलित आहे. त्यामुळे, शारदीय नवरात्रौत्सव काळात केवळ पुणेकरच नव्हे तर महाराष्ट्राच्या विविध भागातून भाविकभक्त आईच्या दर्शनासाठी येत असतात. त्यामुळे, राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने या मंदिराला ‘क’ वर्ग दर्जा दिला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री असताना या मंदिरासाठी १.५० कोटीचा निधी मंजूर केला होता. या कामाचे आज पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
कार्यक्रमाला आमदार माधुरी मिसाळ, मंदिर देवस्थानचे विश्वस्त नंदू अनगळ, उद्योजक कृष्णकुमार गोयल, माजी नगरसेवक आदित्य माळवे, शाम सातपुते, रवी साळेगावकर, दत्ता खाडे आदी उपस्थित होते.