पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी युवा मोर्चाने काम करावे, चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

पुणे : भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाच्या पुणे शहराची कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली. यावेळी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित राहून सर्व पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.