गिरगाव चौपाटी येथील सेठ तुलसीदास किलाचंद उद्यानाचे सुशोभीकरण आणि १८ शिल्पांचे अनावरण संपन्न 

23

मुंबई : मुंबईतील गिरगाव चौपाटी येथील सेठ तुलसीदास किलाचंद उद्यानाच्या सुशोभीकरणाचे तसेच उद्यान परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जे.पी.नड्डाजी यांच्या हस्ते करण्यात आले.   यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची देखील प्रमुख उपस्थिती होती. या ठिकाणी असलेल्या १८ शिल्पांचे अनावरण करण्यात आले.

उद्यानातील १८ शिल्पांमध्ये, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर विनायक  दामोदर सावरकर, डॉ. नाना शंकर शेठ, डॉ. होमी भाभा, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, सावित्रीबाई फुले, बाबू गेनू, भारतरत्न सचिन तेंडुलकर, भारतरत्न लता मंगेशकर, भारतरत्न जमशेदजी टाटा, दादासाहेब फाळके, सेठ मोतीलाल शाह, बाळासाहेब ठाकरे, अशोक कुमार जैन, रामनाथ गोयंका,  कुसुमाग्रज, धीरूभाई अंबानी, कोळी पुरुष यांची रेखीव शिल्पे साकारली आहेत.
यावेळी कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा, शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष ऍड. राहुल नार्वेकर, महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर तसेच भाजपचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.