मुंबई : मुंबईतील वांद्रे येथील सावित्रीदेवी फुले महीला शासकीय वसतिगृह इमारतीच्या कामकाजाची उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पाहणी केली. दरम्यान, वसतिगृह विद्यार्थीनींकरीता तातडीने सुरू करण्यासाठी येथे जेवणाची व्यवस्था , स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची सोय, मुलींच्या सुरक्षेसाठी वसतिगृहात तीन सत्रात सुरक्षा रक्षक नियुक्ती इत्यादी विषयांबाबत यावेळी पाटील यांनी सविस्तर आढावा घेतला.
चंद्रकांत पाटील यांनी वसतिगृहाच्या इमारतीची पाहणी केली. उपस्थित सर्व अधिकाऱ्यांकडून पाटील यांनी सर्व माहिती घेतली. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मुंबई विभागाचे सहसंचालक हरिभाऊ शिंदे, कार्यकरी अभियंता सचिन धात्रक व संबंधित अधिकारी उपस्थित होते.