चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने रेशनकार्ड दुरुस्ती होईपर्यंत लोकसहभागातून धान्य उपलब्ध करून देण्यास सुरुवात
				पुणे : संतशिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान मध्ये सांगितले आहे की, ‘जो जे वांच्छिल तो ते लाहो…’ म्हणजे सर्वांच्या मंगलइच्छा पूर्ण होवोत. कोथरुड मधील प्रत्येक नागरिकांना इच्छित सर्व गोष्टी मिळाव्यात यासाठी कोथरूड मतदार संघाचे आमदार आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील नेहमीच प्रयत्न असतात. त्यासाठी ते कोथरूडमध्ये अनेक उपक्रम राबवत असतात. यातीलच एक उपक्रम म्हणजे कोथरूडकरांना रेशन कार्ड मिळवून देणे.