देशातील युवा पिढीने भारताचा लौकिक जगाच्या नकाशावर वाढावा यासाठी प्रयत्नशील रहावे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आवाहन

6

सोलापूर : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी सोलापूर दौऱ्यादरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात बांधण्यात आलेल्या मुलांच्या नूतन वसतिगृह इमारतीचे उद्घाटन केले.

चंद्रकांत पाटील यांनी यावेळी म्हटले कि, देशातील युवा पिढी ही भारताची खरी ताकद आहे. म्हणून, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन राज्यातील विद्यार्थ्यांना सुलभरित्या शिक्षण घेता यावे यासाठी नवीन शैक्षणिक धोरण राबवित असल्याचे अधोरेखीत केले. ‘सबका साथ, सबका विकास’ सबका प्रयास या तत्वावर वाटचाल करत असताना देशातील युवा पिढीने भारताचा लौकिक जगाच्या नकाशावर वाढावा यासाठी प्रयत्नशील रहावे असे आवाहन पाटील यांनी याप्रसंगी केले.

Get real time updates directly on you device, subscribe now.