पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शेळगी ते दहिटणे रस्ता रुंदीकरणासह कॉंक्रिटीकरण कामाचे उदघाटन संपन्न

12
सोलापूर : सोलापूरमधील शेळगी ते दहिटणे दरम्यानच्या रस्ता काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ तसेच ड्रेनेज लाईनच्या कामाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात गेल्या ९ वर्षात देशाने विविधांगी विकास साधला आहे. याच धर्तीवर सोलापूर जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबध्द राहणार असल्याची ग्वाही याप्रसंगी पाटील यांनी दिली. या रस्ता विकास कामांसाठी 11 कोटी 46 लाख तर ड्रेनेज लाईन साठी 45 लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे.
यावेळी खासदार जय सिध्देश्वर शिवाचार्य महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, किरण देशमुख, मोहन डांगरे, हरिदादा सरवदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे अन्य मान्यवर यांच्या सह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.