पुणे : सनी निम्हण यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘पुणे द ट्विन सिटी मॅरेथॉन – रन फॉर अमृतकाल’चे आयोजन केले होते. या स्पर्धेतील खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हजेरी लावली.
चंद्रकांत पाटील यांनी म्हटले कि, ‘रन फॉर अमृतकाल’ म्हणजे केवळ एक सामुदायिक धाव नसून ती भारताच्या स्वातंत्र्याच्या १०० वर्षांपर्यंत देशातील क्रीडा क्षेत्राला बदलणारी सामाजिक आणि फिटनेस चळवळ आहे. ‘रन फॉर अमृतकालचे’ उद्दिष्ट फिटनेस शिवाय शिक्षण, पर्यावरण आणि उद्योगांना प्रोत्साहन देणे आहे. म्हणून, या अनुषंगाने सनी निम्हण यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून ‘पुणे द ट्विन सिटी मॅरेथॉन – रन फॉर अमृतकाल’चे आयोजन केले आहे.
चंद्रकांत पाटील यांनी या स्पर्धेला भेट देऊन खेळाडुंना प्रोत्साहन दिले. तसेच, स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडुंनी स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटावा अशा शुभेच्छा दिल्या. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध हॉकीपटू पद्मश्री धनराज पिल्ले हे देखील उपस्थित होते.