संरक्षण उद्योगातील संधी लक्षात घेता, यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यासक्रमाची रचना करण्यात येईल – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

20
पुणे : शौर्यशाली भारतीय सैन्य दलाच्या सामर्थ्याचे दर्शन घडावे यासाठी पुण्यातील मोशी येथे महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो २०२४ महा प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या महाप्रदर्शनाचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती
मोशीत आयोजित हे अतिशय भव्य प्रकारचे प्रदर्शन असून; अभियांत्रिकी शाखेतील विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे. संरक्षण उद्योग हा देशात नव्याने विकसित होत आहे. नव्या शैक्षणिक धोरणात उद्योगांची गरज ओळखून अभ्यासक्रम विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. अशा अभ्यासक्रमासाठी केंद्र आणि राज्य शासन सहकार्य करीत आहे. येत्या जूनपासून प्रत्येक जिल्ह्यातील उद्योगांना आवश्यक असणारे अभ्यासक्रम विकसित करण्यात येणार असून; संरक्षण उद्योगातील संधी लक्षात घेता, यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी अभ्यासक्रमाची रचना करण्यात येईल, अशी ग्वाही यावेळी पाटील यांनी दिली.

यावेळी मॅक्स एअरोस्पेस ॲण्ड एव्हीएशन प्रा.लि., एसबीएल एनर्जी लिमिटेड, निबे लिमिटेड आणि एमआयल आणि महाराष्ट्र शासन यांच्यात संरक्षण उत्पादनाशी संबंधित विविध सामंजस्य कराराचे आदान प्रदान करण्यात आले.

यावेळी मंत्री उदय सामंतज, ले.जनरल अजय कुमार सिंग, एअर मार्शल विभास पांडे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार अश्विनी जगताप, महेश शिंदे, उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे आदी, गणेश निबे यांच्या सह इतर मान्यवर उपस्थित होते.

Get real time updates directly on you device, subscribe now.